Pune News | पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर सायबर हल्ला | Sakal Media
पुणे महानगरपालिकेच्या माजी आयुक्तांचे नाव आणि फोटो वापरून पालिकेतील मुख्य अभियंताची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. माजी आयुक्त कुणाल कुमार यांचा फोटो वापरून व्हॉट्सॲपवरुन पुणे महानगर पालिकेचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल यांची फसवणूक झाली आहे. महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांची फसवणूक झाल्याने खळबळ. यामागे कुठली टोळी आहे का आणि किती अधिकाऱ्यांची फसवणूक झाली आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.